पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात चार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या सहायक फौजदारानं महिला पोलीस कर्मचार्‍यासोबत मोबाईलवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर त्याच महिलेस तीन महिला पोलिसांकडून मारहाण करून धमकी देण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्यानं तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नकांत गणपतराव इंगळे (वय ५४), असं शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदाराचं नाव असून, त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतर तीन महिला कर्मचाऱ्यांविरोधात मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
pune marathi news, pune bail marathi news
पुणे: बनावट कागदपत्रे तयार करून जामीनदार उभा करणे अंगलट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. ही महिला सध्या शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहते. त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी आरोपी महिला पोलीस कर्मचार्‍यांनी संगनमत करून खोटा अर्ज केला होता. त्यानंतर सहायक फौजदार रत्नकांत गणपतराव इंगळे यांनी फिर्यादी महिलेस फोन करून तुझा अर्ज आला आहे, असं सांगत सदरील महिला पोलीस कर्मचाऱ्याशी अश्लील भाषेत संवाद केला. त्या संपूर्ण संभाषणाची फिर्यादीने सीडी तयार केली होती.

हेही वाचा-कोयता हातात घेऊन फोटो काढणाऱ्या ‘भाई’ ला पोलिसांसमोर जोडावे लागले हात

दरम्यान, या प्रकरणानंतर आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन मोबाईल आपटला आणि संभाषणाची सीडी फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात न घेतल्याने, अखेर फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.