News Flash

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार!

शुक्रवारी उशिरा पण कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

संग्रहीत

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंम्पिंग स्टेशनवरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार २० मे रोजी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तर दुसर्‍या दिवशी २१ मे शुक्रवारी उशिरा पण कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत माहिती देण्यात आली.

 

दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीला करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका बसला आहे. कामगार आणि बांधकाम साहित्याची वानवा असल्याने यंदा दुरुस्तीची कामेच होऊ न शकल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने धरण दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद के ली असून या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करणे, तर दीर्घ कालावधीच्या कामांचे नियोजन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

संचारबंदी, निर्बंधांचा टेमघर धरण दुरुस्तीला फटका

पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम २००० मध्ये सुरू होऊन २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा या ठिकाणी करण्यात येत होता. सन २०१७ मध्ये धरणातून पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.

पाणीपुरवठय़ाला अर्थपुरवठय़ाअभावी फटका

समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटींचे कर्ज घेण्यासाठी बँकांकडून महापालिके ला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आधीच संथगतीने सुरू असलेल्या योजनेच्या कामांना फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या बँकांनी कर्जपुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे, त्यांनी व्याजदर सांगितलेला नाही. त्यामुळे वित्तीय साहाय्य घेण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता असून समान पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची चणचण भासण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 5:59 pm

Web Title: pune water supply to be cut off on thursday msr 87 svk 88
Next Stories
1 पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन!
2 कोरोना काळातील कामांसाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताही नेता फिरला नसेल : चंद्रकांत पाटील
3 कठोर निर्बंधात गुंडाच्या अंत्यविधीसाठी गर्दी
Just Now!
X