27 February 2021

News Flash

पुणे : ताडिवाला रोड भागात पतीकडून पत्नी, अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

आरोपी पती आयाज आणि त्याची पत्नी तबस्सुम हे दोघे वेगळे राहत होते. त्यांच्यामध्ये घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरु आहे.

पुणे : ताडिवाला रोड भागात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलीची धारदार शत्राने निर्घुण हत्या केली आहे.

पुण्यातील ताडिवाला रोड भागात भीषण हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे. पतीने घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीत हे हत्याकांड घडले आहे. आरोपी पती आयाज शेख याने पत्नी तबस्सुम शेख आणि अडीच वर्षाची मुलगी अलिना शेख या दोघांची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली आहे. या घटनेची माहिती कळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तेथून  चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

आरोपी पती आयाज आणि त्याची पत्नी तबस्सुम हे दोघे वेगळे राहत होते. त्यांच्यामध्ये घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरु आहे. दरम्यान, किरकोळ वादामुळे चिडलेल्या आयाजने पत्नीच्या माहेरी जाऊन पहाटे झोपेत असतानाच तिच्यावर आणि अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या गळ्यावर वार केले. यात त्या दोघींचा मृत्यू झाला आहे. चिडलेल्या आयाजने पत्नीची हत्या केल्यानंतर घराच्या भिंतीवर रक्ताने ‘मै किसको नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे’ असा मजूकरही लिहिला आहे.

पत्नीवर आणि मुलीवर वार केल्यानंतर आयाजने स्वत:वर देखील वार करुन घेतले असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे, आरोपी पती आयाज हा कोंढवा भागात राहतो तर त्याची पत्नी तबस्सुम हीचे माहेर ताडीवाला रोड येथे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 8:19 am

Web Title: pune woman and girl child untimely murder by husbund at tadivala road area
Next Stories
1 धक्कादायक! पुणे-मुंबई प्रवासात युवकाला ३४ हजार रुपयाला लुटलं
2 पाणी अहवाल अद्याप सादर नाही
3 संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
Just Now!
X