21 January 2021

News Flash

पुण्यातील विकृत घटना; वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलेल्या महिलेसमोर केलं नग्न नृत्य

घरगुती भांडणांमुळे ती नवऱ्यासोबत राहत नाही....

बर्थ डे पार्टीच्या निमित्ताने महिलेला फ्लॅटवर बोलवून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यानंतर महिन्याभराने महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवून एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीचा बांधकामाचा व्यवसाय आहे. तक्रारदार महिला सध्या कुठेही नोकरी करत नाहीय.

एफआयआरनुसार, तक्रारदार महिलेचा २००६ साली विवाह झाला. पण घरगुती भांडणांमुळे ती नवऱ्यासोबत राहत नाही. तक्रारदार महिला मागच्या तीन वर्षांपासून तिन्ही आरोपींन ओळखत होती. महिलेने तिच्या एका दुसऱ्या मित्राला ११ लाख रुपये दिले होते. महिला त्या मित्राकडे दिलेले पैसे परत मागत होती. पण तो मित्र पैसे परत करत नव्हता. तिने ही गोष्ट तिच्या तीन मित्रांना सांगितली. त्यांनी परिस्थितीचा फायदा उचलून त्या महिलेला २५ ऑक्टोबरला बर्थ डे पार्टीसाठी एका फ्लॅटवर बोलावले.

तीने ज्या मित्राला११ लाख रुपये दिले होते, तो सुद्धा फ्लॅटवर येईल असे तिला त्या तिघांनी सांगितले होते. त्या तिघांच्या शब्दावर विश्वास ठेऊन पैसे परत मिळतील, या अपेक्षेने ती महिला फ्लॅटवर गेली. ज्याला पैसे दिले होते, तो माणूस फ्लॅटवर दिसला नाही म्हणून तिने त्यांच्याजवळ विचारणा केली, त्यावेळी तो थोडयावेळाने येईल असे उत्तर दिले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी अंगावरचे कपडे काढून महिलेसमोर नेकेड नृत्य सुरु केले. त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिला हा सर्व प्रकार पाहून घाबरली तिने कसाबसा तिथून पळ काढला. त्यानंतर ती आजारी पडली असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. विविध कलमांतर्गत पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणात तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 2:17 pm

Web Title: pune woman molested at fake birthday party three booked dmp 82
Next Stories
1 “दादा न्याय द्या,” उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी; पुण्यात बेमुदत आंदोलन सुरु
2 वाहतूकदारांना सरसकट करमाफी
3 पुण्यात रशियन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु; १७ जणांना दिला डोस
Just Now!
X