News Flash

पुणे: कारागृहातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

खुनाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या एका कैद्याने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

खुनाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या एका कैद्याने रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील प्रजापती (२५) असे मृत कैद्याचे नाव आहे. सुनील प्रजापती पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. पण मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील प्रजापती याला धारवाड येथील एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

आरोपी सुनील याचे पंधरा दिवसांपूर्वी मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे आरोपी सुनील याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुनीलने अंगावर पांघरुण घेण्यासाठी देण्यात आलेली रझई फाडली आणि त्या रझईचा एक दोर करून, गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा तपास येरवडा पोलीस करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 12:27 pm

Web Title: pune yerwada jail prisoner suicide in hospital svk 88 dmp 82
Next Stories
1 … म्हणून या लग्नात झाला कारगिल युद्धातील जवानांचा सत्कार
2 साखर उद्योगाला सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा – जयप्रकाश दांडेगावकर
3 कडाक्याची थंडी पुन्हा अवतरणार!
Just Now!
X