पुण्यातील शनिवारवाडयास देशभरातील पर्यटक भेट देत असतात. एरवी दिल्ली दरवाजा बंद असतो. त्यातील छोटा दरवाजा मधून पर्यटकांना प्रवेश दिला जातो. तर मागील काही वर्षापासून थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाडयाचा वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात येतो. यंदा 287 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने शनिवारवाडयाचा दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आला. हा भव्य दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यास मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, माधव गांगल, उमेश देशमुख, अनिल नेने आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले.
यावेळी उदयसिंह पेशवा म्हणाले की, शनिवारवाडा हटाओ, ही मोहिम झाली. यापार्श्वभूमीवर शनिवारवाडयाचा 287 व्या वर्धापनदिन सोहळा दिमाखात पार पडतोय हे महत्त्वाचे असून शनिवारवाडयातील अनेक गोष्टींची दुरवस्था झालेली आहे. मेघडंबरीच्या लाकडाला कित्येक महिन्यात पॉलिशही करण्यात आलेले नाही. अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 1:17 pm