21 February 2019

News Flash

पुण्यात पीएमपीच्या निलंबित कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंडकर यांना दोन महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते.

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील पीएमपीएमएलच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास उघडकीस आली. तुकाराम निवृत्ती मुंडकर (वय ४२, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

मुंडकर हे पुण्यातील पीएमपीएमएलमध्ये कार्यरत होते. ते भोसरी येथे राहत होते. दोन महिन्यांपूर्वी पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांना निलंबित केले होते. मंगळवारी मुंडकर यांच्या पत्नी त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्या रात्री ११ वाजता घरी परतल्यानंतर मुंडकर यांनी गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले. मुंडकर यांना उपचारासाठी त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंडकर यांच्या आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिलेली नाही. त्यामुळे मुंडकर यांनी नेमके कशामुळे आत्महत्या केली हे समजू शकलेले नाही. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First Published on February 14, 2018 10:20 am

Web Title: punes pmpml suspended employee committed suicide