25 February 2021

News Flash

गर्दीवर नियंत्रण नाही!

नव्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दिवसाला सरासरी १५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नागरिकांकडून बेफिकिरी; प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईतही ढिलाई

पुणे : करोना संसर्ग नियंत्रणात येताच मुखपट्टीचा वापर न करता गर्दी करणाºयांवर कारवाई करण्यातही महापालिका आणि पोलिसांनी ढिलाई दाखविली. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून मुखपट्टीचा वापर होत नसतानाही गेल्या तीन महिन्यांत कारवाई देखील थंडावली. नागरिकांची बेफिकिरी आणि थंडावलेली कारवाई करोना संसर्गाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरली. नव्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दिवसाला सरासरी १५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हीच बाब कारवाईतही ढिलाई आल्याचे स्पष्ट करत आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. करोना नियंत्रणात नसताना मुखपट्टीचा वापर न करणाºयांवर, योग्य पद्धतीने मुखपट्टी न वापरणाºयांवर जोरदार कारवाई सुरू झाली.

महापालिका आयुक्त यांनी कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय स्तरावर दिले. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष पथकाला अधिकार देण्यात आले आणि कारवाईचा जोर सुरू झाला. कारवाईच्या भीतीपोटी नागरिकांकडूनही मुखपट्टीचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात आले. मात्र करोना नियंत्रणात आल्यानंतर नागरिकांकडून निष्काळजीपणा दाखविण्यास सुरुवात झाली. सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात, रस्त्यांवर मुखपट्टीचा वापर न करता मुक्त संचार सुरू झाला. या कालावधीत महापालिका आणि पोलिसांकडूनही मुखपट्टीचा वापर न करणाºयांवर जुजबी कारवाई झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:02 am

Web Title: punitive action by the administration corona virus infection akp 94
Next Stories
1 हजार रुपयांची कारवाई कागदावरच
2 शासकीय कार्यालयांमध्ये नियमांबाबत बेफिकिरी
3 रखडलेल्या रस्ते विकसनाची घाई
Just Now!
X