पिंपरी-चिंचवड शहरात पालिका आणि पोलीस प्रशासनाने एका तरुणाला तोंडाला रुमाल बांधला असतानाही दंड केला आहे. यासंदर्भात या तरुणाने सोशल मीडियातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या तरुणाशी संपर्क केला असता त्याने महापालिका आणि पोलिसांवर विनाकारण दंड केल्याचा आरोप केला.

प्रताप गुंजाळ असं या तरुणाचे नाव असून त्याला दंड ठोठावण्याचा प्रकार दापोडी येथे घडला. जिल्हा प्रशासनाने महापालिका आणि पोलीस प्रशासनाला विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी रुमाल बांधून तोंड व्यवस्थित झाकलेलं असताना देखील कारवाया केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री

प्रताप गुंजाळ हा तरुण दापोडीत राहात असून तो कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर करोनाकाळात खबरदारी म्हणून तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून जात होता. त्याला महापालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्यात अडवून त्याच्याकडे मास्क नसल्याचे सांगत दीडशे रुपयांचा दंड वसूल केला. याची रीतसर पावती देखील त्याला देण्यात आली, मात्र या पावतीवर कुठल्या कारणासाठी हा दंड आकारण्यात आला त्याचा उल्लेखही केलेला नाही.

दरम्यान, इतरांनी तोंडाला रुमाल बांधलेले असतानाही त्यांच्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रतापला ठोठावलेल्या दंडाच्या पावतीची पोस्ट व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर व्हायरल झाली आहे. त्यामुळे विनाकारण दंड केला जात असल्याचा आरोप प्रतापने केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.