पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी महसूल अभिलेख अद्ययावत करणे, स्थानिक शेतकऱ्यांची संमती, भूसंपादनाची अधिसूचना निघणे, प्रत्यक्ष भूसंपादन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल असे विविध टप्पे पार पडण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात राव बोलत होते. नियोजित विमानतळ, जागा निश्चितीचे टप्पे, प्रत्यक्ष अंमलबजावणी यांबाबत त्यांनी भाष्य केले. राव म्हणाले, पुरंदर तालुक्?यात प्रस्तावित असलेले विमानतळ सहा किलोमीटर लांब आणि तीन किलोमीटर रुंद या परिघात होणार आहे. पुरंदर विमानतळासाठी परवानगी देताना संरक्षण विभागाने विमानतळाची धावपट्टी (रनवे) ही पूर्व—पश्चिम या दिशेला असावी, अशी अट घातली आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाची धावपट्टी पूर्व—पश्चिम करण्यात येणार आहे. विमानतळ पूर्णत्वास आल्यानंतर लोहगाव विमानतळावरील विमान उड्डाणांवर त्याचा काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यात आला. लोहगाव आणि पुरंदर विमानतळांचे सामाईक हवाई क्षेत्र (कॉमन एअर स्पेस) आहे.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

लोहगाव विमानतळावरून प्रतिदिन ११० प्रवासी विमाने ये—जा करतात. तर संरक्षण विभागाच्या विमानांचे हेच प्रमाण केवळ आठ एवढेच आहे. लोहगाव विमानतळावरून ९२ टक्के उड्डाणे ही नागरी आहेत. तर संरक्षण विभागाचे हेच प्रमाण आठ  टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे. लोहगाव विमानतळ संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाकडे आहे. त्यामुळेच हवाई दलाकडून काही प्रमाणात शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. परंतु, त्याचे निरसन करण्यात आले आहे.

पुरंदर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत या गावांमधील युवक—युवतींना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी रोजगाराच्या मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे साहजिकच प्रचंड प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे कौशल्य विकासासारखे कार्यक्रम हा एक पुर्नवसन धोरणाचा एक भाग असल्याचेही राव यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणार

जिल्ह्यत विमानतळासाठी जागा निवडताना अकरा ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचे हवाई सव्‍‌र्हेक्षण करण्यात आले. प्रत्येक जागेचे गुण-दोष तपासून त्यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्याकरिता २७०० ते २८०० हेक्?टर जागेची आवश्?यकता आहे. त्यासाठी जागेचे भूसंपादन करताना त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगायला लागू नयेत, हे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार आहे, असेही राव यांनी सांगितले.