09 March 2021

News Flash

वाचकांपर्यंत पुस्तके नेणारे ‘पुस्तकवाले’

सोसायटय़ांमधील आबालवृद्धांपर्यंत पुस्तके  नेण्याचे काम ‘पुस्तकवाले’ हा उत्साही तरुणांचा गट करत आहे

पुणे : सोसायटय़ांमध्ये किराणा सामान, औषधे, खाद्य पदरथ पुरवले जातात, तर पुस्तके  का नाहीत या विचारातून आणि वाचनावरच्या प्रेमापोटी सोसायटय़ांमधील आबालवृद्धांपर्यंत पुस्तके  नेण्याचे काम ‘पुस्तकवाले’ हा उत्साही तरुणांचा गट करत आहे. आशय वाळंबे आणि त्याची पत्नी रुतिका यांनी पुढाकार घेऊन पुस्तकवाले हा गट स्थापन के ला असून, गेले दोन महिने दर शनिवार-रविवारी  वेगवेगळ्या भागातील सोसायटय़ांमध्ये विक्री करत आहेत.

करोना संसर्गामुळे यंदा शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. तसेच संसर्गाच्या भीतीने लहान मुले, ज्येष्ठांना बाहेरही पडता येत नाही. इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे शिक्षण, मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी, स्मार्टफोन  हेच पर्याय आहेत. त्यामुळे वाचकांना पुस्तकांपर्यंत आणण्यासाठी,  पुस्तके  हातात घेऊन, स्वत: निवडून ती खरेदी करता येण्यासाठी, वाचन सुरू राहण्यासाठी ‘पुस्तकवाले’चा जन्म झाला. आयटी कं पनीत कार्यरत आशय वाळंबे आणि त्याची पत्नी रुतिका यांच्या या कल्पनेला त्यांच्या मित्रांनी साथ दिली.

पुस्तक हाताळून, चाळून विकत घेण्याचा अनुभव फार वेगळा असतो. तो या निमित्ताने घेता आला. आशय आणि रुतिका स्वत: वाचक असल्याने त्यांना पुस्तकांची चांगली माहिती आहे. किं डल, मोबाइलसारखी माध्यमे असतानाही पुस्तके  वाचली जाणे, वाचनामुळे ‘स्क्रीनटाइम’ कमी होणे चांगली बाब आहे.

– अस्मिता सोमण, सचिव, सिग्मा वन सोसायटी, कोथरूड

पुस्तके  वाचकांपर्यंत नेण्याची गरज

वाचनाचा संस्कार टिकावा, हा साधा विचार पुस्तकवाले या उपक्रमामागे असल्याचे आशयने नमूद के ले. या उपक्रमातून जाणवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजकाल लोक वाचत नाही हा समज चुकीचा आहे. कारण मिळणाऱ्या प्रतिसादातून लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सगळ्यांनाच पुस्तके  हवी असल्याचे दिसून आले. पण पुस्तके  वाचकांपर्यंत नेली पाहिजेत.  तीन पिढय़ा एकत्र येऊन पुस्तके  चाळतात, खरेदी करून वाचतात हा आनंद आहे, असेही आशय याने या वेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 12:54 am

Web Title: pustakwale group book supply in housing societies in pune zws 70
Next Stories
1 पिंपरी पोलीस आयुक्तालयाचा गैरकारभार चव्हाटय़ावर
2 भारत आणि गरजू देशांसाठी सीरमकडून अतिरिक्त १० कोटी डोस
3 राज्यात लवकरच ‘कॅराव्हॅन’ पर्यटन
Just Now!
X