करोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे ‘आरोग्य व शारीरिक शिक्षण’ या दहावी आणि बारावीच्या विषयाची मैदानावरील प्रात्यक्षिक परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. एकावेळी विद्यार्थ्यांना मैदानावर बोलवण्यास संसर्गाचा धोका असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेबाबत राज्य मंडळाने संके तस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध के ले आहे. त्यात बारावीसाठी पन्नास गुणांची आणि दहावीसाठी शंभर गुणांची परीक्षा घेतली जाते. त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांचा समावेश असतो.

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Punishment of senior citizen doctor held responsible for patient death upheld  Mumbai
रुग्णाच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक डॉक्टरची शिक्षा कायम; मात्र वयामुळे शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

राज्य मंडळाने प्रसिद्ध के लेल्या परिपत्रकात १० जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळात जमा करण्याची सूचना दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे कमीत कमी संख्येत गट करून प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्यात, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी योगा मॅट, स्किपिंग रोप आदी साहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणणे योग्य राहील. सामायिक साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता चाचण्या घ्याव्यात, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव असताना विद्यार्थ्यांना मैदानावर बोलावून परीक्षा कशी घ्यायची, तसेच विद्यार्थी एकत्र येण्यातून संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गटाने बोलावल्यास बरेच दिवस परीक्षा घ्यावी लागेल. तसेच राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार सांघिक खेळाचीही परीक्षा घ्यायची असल्याने ते धोकादायक ठरू शकते.

त्यामुळे यंदा प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखी परीक्षेनुसार श्रेणी देण्याबाबतचा राज्य मंडळाने विचार करावा, असे काही शिक्षकांनी सांगितले.

आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत कधीही करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी. मैदानावर बोलावून परीक्षा घेता न आल्यास ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचाही विचार शिक्षक करू शकतात.

– दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य मंडळ