News Flash

डेक्कन क्वीन रोखून धरणाऱ्या तीन महिला प्रवाशांवर कारवाई

त्यांना आज लोहमार्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

deccan queen express : यापुढेही डेक्कन क्वीन फलाट क्रमांक ५ वरूनच सुटेल, असे रेल्वे प्रबंधक बी. दादाभोय यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस रोखून धरणाऱ्या तीन महिला प्रवाशांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. नेहमी फलाट क्रमांक १ वरून निघणारी डेक्कन क्वीन गेल्या सहा महिन्यांपासून फलाट क्रमांक ५ वरून निघत आहे. यासंबंधी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नियमित प्रवाशांनी डेक्कन क्वीन रोखून धरली होती. त्यामुळे ही गाडी तब्बल पाऊणतास उशीरा सुटली होती. या प्रकरणी बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून तीन आंदोलनकर्त्या महिलांवर कारवाई करण्यात आली. सीमा सुहास गाडगीळ, वर्षा योगेश रेळे आणि फातिमा जाफर हुसैन या तीन महिला प्रवाशांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यांना आज लोहमार्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच सध्या डेक्कन क्वीन रोखून धरणाऱ्या अन्य १०० प्रवाशांची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावरदेखील लवकरच कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

‘डेक्कन क्वीन’ झाली ८८ वर्षांची

या कारवाईविषयी माहिती देताना रेल्वे प्रबंधक बी. दादाभोय यांनी म्हटले  की, रेल्वे थांबून ठेवणे हे एकप्रकारे राष्ट्रविरोधी आंदोलन असून याचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळे कायदा हाती घेणाऱ्यांविरोधात कारवाई कडक केली जाणार आहे. तसेच यापुढेही डेक्कन क्वीन फलाट क्रमांक ५ वरूनच सुटेल, असे बी. दादाभोय यांनी सांगितले. पुणे-मुंबई-पुणे असा रोज प्रवास करणाऱ्यांसाठी डेक्कन क्वीन ही अत्यंत सोयीची रेल्वे असल्याचे मानले जाते. परंतु, नेहमी फलाट क्रमांक १ वर उभारणारी डेक्कन क्वीन गेल्या ६ महिन्यांपासून फलाट ५ वर थांबत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवासी संघटनेच्या हर्षा शहा यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 9:09 pm

Web Title: railway take action against three ladies passagnes who halt down deccan queen express in pune
Next Stories
1 ‘कोपर्डी पीडितेचं स्मारक उभारा’ म्हणणाऱ्या भैय्युजी महाराजांचा पुतळा जाळला
2 शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समितीचा ‘पर्याय’
3 राष्ट्रवादीचे पाप
Just Now!
X