14 August 2020

News Flash

कोकण वगळता इतरत्र पाऊस ओसरणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही दिवसांची विश्रांती

अलिबाग येथे  सोमवारी  समुद्राला मोठी भरती आली होती,  यामुळे  किनाऱ्यावर  मोठय़ा लाटा  धडकत होत्या. (फोटो- जितू शिगवण)

कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागांत पाऊस ओसरणार असून, पुढील काही दिवस तो विश्रांती घेईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सोमवारी (६ जुलै) विदर्भ आणि मराठवाडय़ातील तुरळक भागात जोरदार पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठय़ा पावसाची नोंद झाली.

राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी चोवीस तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे.

सध्या गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागांत सर्वच ठिकाणी आणि प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यंमध्ये पाऊस कायम राहणार आहे.

कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर ओसरत चालला आहे. घाटमाथ्यांवरही पाऊस कमी झाला आहे. ८ ते १० जुलै या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

मराठवाडय़ात मात्र पावसाने दडी मारली होती. चोवीस तासांमध्ये बेलापूर येथे २१० मि.मी. ठाण्यात १६० मि.मी. कल्याण, मुंबई, पालघर, उल्हासनगर, अंबरनाथ आदी भागांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. विदर्भातील भंडारा येथे १०० मि.मी. पावसाची नोंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:27 am

Web Title: rain elsewhere except konkan abn 97
Next Stories
1 मावळात वर्षांविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर
2 Coronavirus : जुलैअखेर पुण्यात २० हजार रुग्णांची शक्यता
3 नोकरी सोडून घरपोच तयार पीठ पोहोचवण्याचा अभियंत्याचा व्यवसाय
Just Now!
X