पुणे शहर आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र साडे नऊ वाजल्यापासून अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पाऊस पडेल. तर मराठावाड्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

त्याच दरम्यान आज पुण्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची सकाळच्या सुमारास तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये मध्यमस्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून आज सकाळच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.