News Flash

पावसाचे वातावरण, पण तात्पुरतेच!

. पुढे ३-४ सप्टेंबरच्या आसपास आतासारखीच स्थिती असेल. मात्र, मोठय़ा प्रमाणात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

| August 29, 2015 03:12 am

पुण्यासह राज्याच्या काही भागात शुक्रवारी पावसाचे वातावरण होते. पुण्यात ५ मिलिमीटर, रत्नागिरी येथे २४, तर नागपूर येथे १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, हे वातावरण तात्पुरते असून, रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
पुण्यात गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाच्या चांगल्या सरी पडल्या. त्याचबरोबर राज्याच्या काही भागातही अशीच स्थिती होती. शुक्रवारी दिवसभरात पुण्यात ५ मिलिमीटरची नोंद झाली. याचबरोबर राज्यात इतरत्र अहमदनगर (०.९), कोल्हापूर (१), महाबळेश्वर (७), मुंबई (४), अलिबाग (६), रत्नागिरी (२४), उस्मानाबाद (३), चंद्रपूर (५), नागपूर (१४) येथेही पावसाची नोंद झाली. शनिवारीसुद्धा काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी होईल. पुढे ३-४ सप्टेंबरच्या आसपास आतासारखीच स्थिती असेल. मात्र, मोठय़ा प्रमाणात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 3:12 am

Web Title: rain monsoon climate observatory
Next Stories
1 स्मार्ट सिटीसाठी मेकँझी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करू नका
2 पालिकेतील गर्भलिंगनिदान कक्षाचे थंडावलेले कामकाज अखेर सुरू!
3 ‘महावितरण’चा लोकसहभाग केवळ घोषणेपुरताच!
Just Now!
X