कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना मंगळवारी वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. जोरदार पाऊस, साईबाबा पालखी, मोर्चा आणि खड्डे-उखडलेले रस्ते अशा विविध कारणांमुळे शहराच्या महत्त्वाच्या रस्त्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. भर पावसात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागला.
शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच, काही रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडल्यामुळे वाहतूक संथ गतीने वाहात होती. मंगळवारी सकाळी नगर रस्ता, गणेशखिंड रस्ता, पुणे स्टेशन परिसर, ब्रेमन चौक, वाकड पूल, सोलापूर रस्ता, शहराच्या मध्य भागातील रस्त्यावर सकाळी दहाच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भर पावसात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. वाकड पुलाजवळ रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, ब्रेमन चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रस्त्याला बसून या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पुणे-नगर रस्त्यावर साईबाबांची पालखी असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती, तर पुणे स्टेशन परिसरात मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांनी पावसात उभे राहून वाहतूक कोंडी दूर केल्यानंतर वाहतूक सुरळित सुरू झाली. दोन दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने वाहात होती. दुपारी अकरानंतर वाहतूक सुरळित सुरू झाल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
Important junction roads on Ghodbunder route closed Some relief from congestion on main road
घोडबंदर मार्गावरील महत्त्वाचे छेद रस्ते बंद, मुख्य मार्गावरील कोंडीमध्ये काही प्रमाणात दिलासा