News Flash

निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट; ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरेंचा आरोप

प्रशासक नेमून महापालिकांवर वचक ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट; ओबीसी आरक्षणावरुन राज ठाकरेंचा आरोप

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मनसेनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात या निमित्ताने वाढ झाली आहे. आजही ते पुन्हा एकदा पुण्यात आले असून त्यांनी पुण्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातल्या ओबीसी आरक्षणासह अनेक प्रश्नांवर आपली मतं मांडली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे.  निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही”.

जातिनिहाय जनगणनेबद्दल विचारणा झाली असता राज म्हणाले, खरंतर ही काही अवघड गोष्ट नाही. अशा प्रकारची जनगणना करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2021 10:58 am

Web Title: raj thackeray pune visit upcoming corporation elections vsk 98 svk 88
Next Stories
1 VIDEO: स्त्री शिक्षणाच्या पहिल्या बळीचा साक्षीदार बाहुली हौद
2 राज्यात बटाट्याची प्रचंड आवक
3 जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील चार शिक्षण संस्थांना स्थान
Just Now!
X