News Flash

राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रतिष्ठानतर्फे गुरुवारपासून (१४ एप्रिल) सात दिवसांच्या राजा परांजपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक स्मारक मंदिर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अभिनेता सचिन खेडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, निर्माता अभिजित पानसे आणि पाश्र्वगायक स्वप्नील बांदोडकर यांना राजा परांजपे सन्मान प्रदान करण्यात येणार असून या सर्वाशी प्रवीण तरडे संवाद साधणार आहेत. शर्वरी जमेनिस यांचा ‘स्वरलयाकृती’ हा कथक नृत्यसंध्येचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे यांनी दिली. राजा परांजपे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २० एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते विक्रम गोखले यांना राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राजाभाऊंच्या निवडक चित्रपटगीतांचा समावेश असलेला ‘लाखाची गोष्ट’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवात ‘जगाच्या पाठीवर’, ‘पुढचं पाऊल’, ‘ऊन-पाऊस’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘सुवासिनी’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘पेडगावचे शहाणे’ आणि ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. याखेरीज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका टिळक स्मारक मंदिर येथे मंगळवारपासून (१२ एप्रिल) उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 3:08 am

Web Title: raja paranjpe mahotsav
Next Stories
1 सतीश शेट्टी खून प्रकरण- तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अटकेत
2 ‘‘हिंदौस्ताँ’ आपणच भाजपला देऊन टाकला!’ – योगेंद्र यादव
3 पदनामे बदलण्याचा प्रस्ताव नाही!
Just Now!
X