31 May 2020

News Flash

शिवजयंती मिरवणुकीतील २१ फुट लांब, 500 किलो वजनी राजपूत तलवारीने वेधले पुणेकरांचे लक्ष

विविध सरदारांचे आकर्षक फुलांची आरस केलेले तब्बल ८५ रथ झाले होते सहभागी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभरात उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जात आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात देखील असाच उत्साह पाहण्यास मिळत आहे. पुण्यात नऊ वर्षांपासून शिवजयंती महोत्सव पुणे समितीच्यावतीने लालमहाल ते एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या पटांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या मिरवणुकीत यंदा देखील विविध सरदारांचे आकर्षक फुलांची आरस केलेले तब्बल ८५ रथ सहभागी झाले होते. त्यामध्ये शिवछत्रपती श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला समस्त क्षत्रिय राजपूत समाजाचा रथ क्रमांक ४७ सर्वांच लक्ष वेधून घेत होता. या रथामध्ये २१ फुट लांब आणि जवळपास ५०० किलो वजनाची तलवार ठेवण्यात आली होती. ही तलवार पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी विनायक काची म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी अनेक उपक्रम घेतले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजपूत समाजाकडून यंदाच्या मिरवणुकीत २१ फुट लांब आणि जवळपास ५०० किलो वजनाची लोखंडी तलवार ठेवण्यात आली आहे. यातून समाजाने एक प्रेरणा घेऊन काम करण्याची आजच्या काळात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता ही तलवार शहरातील कोणत्याही एखाद्या उद्यानात कायम स्वरूपी ठेवून, तिचे कशाप्रकारे जतन करता येईल, त्यादृष्टीने प्रशासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हॅलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी –
एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळयावर ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदा पुष्पवृष्टीचे हे ९ वे वर्ष होते.

मिरवणुकीत सहभागी झालेले ८५ रथ –
मिरवणुकीत जिजाऊशहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, वीर बाजीप्रभु देशपांडे, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव,, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी आणि दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे यांचे स्वराज्यरथ आपआपला गौरवशाली इतिहास मांडत सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 2:31 pm

Web Title: rajput sword weighing 21 feet long 500 kg attracted the attention of punekars msr 87 svk 88
Next Stories
1 बुलाती है मगर जाने का नहीं…, पिंपरी-चिंचवड पोलिसांची TikTok व्हिडीओतून थट्टा
2 छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला हलवलं
3 विद्यापीठात पुढील वर्षी इंडो-फ्रेंच नॉलेज समिट
Just Now!
X