28 February 2021

News Flash

बाळासाहेब देखील म्हणत असतील उद्धवा तुझा निर्णय चुकला – रामदास आठवले

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं, असं देखील म्हणाले आहेत.

“शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन केली. पण, त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र असण्याचे स्वप्नं अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे उद्धवजींनी एकत्र येण्यासाठी पुढे यावे. काल मी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास गेलो होतो. तेव्हा पुतळा पाहून एकच वाटले की, बाळासाहेब दोन्ही हातवर करून एकच म्हणत असतील, उद्धवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा तुझा निर्णय चुकला.” असे विधान केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करून, एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं. मात्र तसं काही झालं नाही. मी त्यांना कालच्या कार्यक्रमात मनातून पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या आहेत. पण त्यांच्यातील अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेस कधीही पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होते, ते साकारण्यासाठी एकत्र यावे. यासाठी मी उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. पण उद्धव ठाकरे यांनी किमान दोन वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे आणि उर्वरित तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावे. मला आजही वाटते भविष्यात आम्ही एकत्र येऊ.”

संभाजी भिडेंवर आता हे सरकार का कारवाई करीत नाही?-
सध्याच्या राज्यसरकार मधील नेते मंडळी ज्या वेळी विरोधी पक्षात होते. तेव्हा संभाजी भिडेंवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी करीत होते. पण आता सरकारमध्ये येऊन वर्ष होत आले, तरी संभाजी भिडेंवर आता हे सरकार का कारवाई करीत नाही? असा प्रश्न रामदास आठवले यांनी यावेळी उपस्थित केला.

आम्ही आगामी महापालिका निवडणुका भाजपा सोबत लढविणार –
राज्यात होणार्‍या आगामी पाच महापालिका निवडणुकांमध्ये आरपीआय-भाजपा सोबत राहणार असून, आम्ही त्या निवडणुका जिंकणार आहोत. त्यानंतर २०२२ मध्ये होणार्‍या महापालिका निवडणुकीत देखील भाजपा सोबत असणार आहोत. आम्हाला त्या निवडणुकीत देखील यश मिळणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 4:58 pm

Web Title: ramdas athavale targets chief minister uddhav thackeray msr 87 svk 88
Next Stories
1 ट्रकमधून १८ लाख रुपयांची वेलची लंपास
2 हडपसर आणि रामटेकडी येथील कचरा प्रकल्पास भीषण आग
3 हडपसर औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पास भीषण आग
Just Now!
X