पुणे स्टेशन परिसरात रांका ज्वेलर्सच्या एका कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरात या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी गाठले. त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटले. त्याच्याकडे असलेले दीड कोटींचे हिरे चोरट्यांनी लंपास केले. अजय होगाडे असे या तरूणाचे नाव आहे अशी माहिती समोर आली आहे.

अजय होगाडे हा तरूण मुंबईतील काळबादेवी भागात असलेल्या रांका ज्वेलर्समधून दीड कोटींचे हिरे आणि दागिने घेऊन पुण्यात गेला होता. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ असलेल्या रिक्षा स्टँडजवळ अजय जेव्हा आला तेव्हा त्याला चार चोरट्यांनी  चाकूचा धाक दाखवला आणि मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेले हिरे आणि दागिने लुटण्यात आले.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अजय होगाडे काही दिवसांपूर्वीच झवेरी बाजारातील दुकानात ऑफिस बॉय म्हणून नोकरीला लागला. दरम्यान या सगळ्या प्रकाराची तक्रार पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चार अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.