अकरा वर्षांच्या मुलीला उसाच्या शेतात पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची आणि नंतर तिचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मौजे खुटगाव येथे घडली. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये गु्न्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
पीडित मुलीचे वडील शेतकरी असून, ते दौंड तालुक्यात राहतात. पीडीत मुलगी पाचवीला शिकत होती. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर परतत असताना अज्ञात व्यक्तीने तिला उसाच्या शेतात नऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर गळा दाबून तिचा खून करण्यात आला. दुपारी शेतातून जात असताना एका व्यक्तीला हा मृतदेह मिळाला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. आरोपीने तिच्या कानातील सोनेही चोरून नेले असल्याची माहिती मिळालीये.