23 September 2020

News Flash

धक्कादायक! ठार मारण्याची धमकी देऊन, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

तक्रार दाखल होताच आरोपीस पोलिसांकडून अटक

प्रतिकात्मक फोटो

पुण्यात अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन, सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कुमार जाधव असे आरोपीचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची एक मैत्रीण आहे. तिच्या मार्फत आरोपी कुमार सोबत ओळख झाली.त्यांनतर दोघे सतत संपर्कात होते. ऑगस्ट महिन्यात आरोपी पीडित तरुणीला एका ठिकाणी घेऊन गेला होता. तिथे तिच्यावर जबदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर कोणालाही काही सांगितल्यास तुला ठार मारेन, तुझे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देखील पीडितेला आरोपी कुमारने दिली. या धमकीमुळे ती घाबरली असल्याने, या बद्दल घरात कोणालाही तिने सांगितले नव्हते.

मात्र, देखील तिच्यावर अत्याचार करणे वारंवार सुरूच राहिल्याने अखेर त्या तरुणीने घरातील सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती चंदननगर पोलीस स्टेशनचे  उपनिरीक्षक किरण वराळ यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 3:34 pm

Web Title: rape of a minor girl threatening to kill msr 87 svk 88
Next Stories
1 ‘जेईई’च्या निकालाबाबत प्रश्नचिन्ह
2 पुण्यात हक्काचे घर आवाक्याबाहेर
3 जेईई मुख्य परीक्षेत स्वयम छुबे राज्यात पहिला
Just Now!
X