27 October 2020

News Flash

पोलीस वसाहतीत महिलेवर बलात्कार; निरीक्षकावर गुन्हा

पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

पोलीस वसाहतीत एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन पोलीस निरीक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पीडित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक माने सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमणुकीवर आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने पुण्यात नेमणुकीस होते, त्या वेळी त्यांची पीडित महिलेबरोबर ओळख झाली होती. माने यांनी महिलेला भवानी पेठेतील पोलीस वसाहतीतील घर दाखविण्यास नेले. तेथे महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर माने यांनी महिलेवर बलात्कार केला.

माने यांनी मोबाइल चित्रीकरण करून महिलेस धमकावले. चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन माने यांनी पुन्हा महिलेवर बलात्कार केला. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. माने यांच्या धमक्यांना घाबरलेल्या महिलेने अखेर समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. समर्थ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:59 am

Web Title: rape of a woman in a police colony crime on the inspector abn 97
Next Stories
1 पुण्यात नव्याने आढळले १५१२ रुग्ण; ४२ करोनाबाधितांचा मृत्यू
2 #CoupleChallenge: “…तर कपलचं खपल चॅलेंज होईल,” पुणे पोलिसांचं भन्नाट ट्विट
3 ‘माझी मुलगी आहे कुठे?’ पुण्यातल्या कोविड सेंटरमधून गायब झालेल्या मुलीच्या आईचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न
Just Now!
X