News Flash

पिंपरीत ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार

पीडित वृद्ध महिलेने घराचा दरवाजा आतून लावला होता.

मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील राजेदाहे गावात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड येथील रूपीनगर परिसरात एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्ध महिला आणि तिचा ४९ वर्षीय मुलगा हे दोघे रुपीनगर भागात राहतात. १३ जानेवारीला या महिलेचा मुलगा कामासाठी बाहेर गेला होता. पीडित वृद्ध महिलेने घराचा दरवाजा आतून लावला होता. मात्र, अज्ञात इसमाने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि या वृद्ध महिलेवर बलात्कार केला. मुलगा घरी आल्यानंतर पीडित महिलेने त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल होताच पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली यात महिलेवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक बोरकर हे याप्रकरणाचा तपास करत आहेत. पीडित महिलेच्या ४९ वर्षीय मुलाचे लग्न झालेले असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेचजण घरात राहात होते, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2018 4:20 pm

Web Title: rape on 83 year old women in pune
Next Stories
1 पुण्यात घरासमोर गाड्या लावण्याच्या वादातून संगणक अभियंत्याची हत्या
2 पिंपरीत मोफत घरांची जाहिरात देऊन भरवलेल्या प्रदर्शनात नागरिकांची तोडफोड
3 शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी नाही, काही तासांत निर्णय मागे
Just Now!
X