05 March 2021

News Flash

पुण्यात ‘व्हॅलेंटाइन डे’ पार्टीत तरुणीवर बलात्कार

टना हडपसर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली.

१७ जुलै रोजी अहमदनगरमधील कोपर्डी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कर्जत येथे बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती.

व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीसाठी  मित्रासोबत घरी आलेल्या तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. याप्रकरणी तरुणाला हडपसर पोलिसांनी गजाआड केले.
फिरोज महंमद शेख (वय २३ रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित तरुणी परराज्यातून पुण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी आणि तिच्या तीन मैत्रिणींनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतली आहे. काही दिवसांपूर्वी जीम प्रशिक्षकासोबत चौघींची ओळख झाली. व्हॅलेंटाईन डे च्या पार्टीसाठी त्यांनी जीम प्रशिक्षकाला शनिवारी रात्री घरी पार्टीसाठी बोलावले होते. जीम प्रशिक्षकासोबत त्याचा मित्र फिरोज शेख तेथे आला होता. मध्यरात्री फिरोज याने झोपेत असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. घाबरलेल्या तरुणीने मैत्रिणींना या प्रकाराची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 9:21 am

Web Title: rape on girl in valentines day party
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’तील स्वतंत्र कंपनीमध्ये आठ लोकप्रतिनिधींचा समावेश होणार
2 पुणेकर गुंतवणूकदारांसाठी बुधवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’
3 स्वीडिश कंपन्यांसाठी पुणे महत्त्वाचे उद्योग केंद्र – स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन
Just Now!
X