पिंपरी येथे वडिलांनीच आपल्या १३ वर्षाच्या मुलीवर तब्बल सहा वर्षे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरोधात वाकड पोलिसांत तक्रार दाखल झाली असून अजून त्याला ताब्यात घेतलेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील काळेवाडी परिसरात पीडित मुलगी आपले वडील व सावत्र आईबरोबर राहते. गेल्या सहा वर्षांपासून वडील वारंवार तिच्यावर बलात्कार करत होते. याबाबत तिने आपल्या सावत्र आईला सांगितले. परंतु हा प्रकार रोखण्याचे सोडून सावत्र आईने काही होत नाही, याकडे दुर्लक्ष कर असा सल्ला दिला. वाकड पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे समजल्याने सावत्र आईने तिला घराच्या बाहेर काढले होते. त्यामुळेच या संतापजनक प्रकाराला वाचा फुटली असून पीडित मुलीने स्वतःच पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक