News Flash

पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना; चालत्या टेम्पोमध्ये महिलेवर केला बलात्कार

पिंपरीत दिवसाआड एका महिलेवर बलात्कार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २९ वर्षीय महिलेवर धावत्या टेम्पोमध्ये क्लीनरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ४० आणि ३५ वयोगटातील अनोळखी व्यक्तींवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथून टेम्पोमध्ये बसलेल्या महिलेवर पिंपरी-चिंचवड, मोशी या ठिकाणी धावत्या टेम्पोत बलात्कार करण्यात आला. महिलेने विरोध केला असता महिलेला मारहाण करण्यात आली.

दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर चालकाने टेम्पो थांबवून मारहाण करत पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापट सुरू असताना दोघांच्या तावडीतून पीडित महिला पळून गेली. जवळच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने शिरगाव पोलीस चौकी गाठत गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिलेला धीर देत नेमकं काय घडलं अस विचारल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शिरगाव पोलीस ठाण्याहून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित महिलेचे तिच्या पतीशी घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यामुळे आपले कपडे घेऊन ती आळंदीला जाण्याकरीता पेरणे फाटा येथे आली. तिथून अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवरून पीडित महिला आळंदीला आली. तेव्हा, रात्रीचे सात वाजले होते. त्यानंतर सात ते साडेदहा वाजेपर्यंत ही महिला एका मंदिरात थांबली. पतीवरील राग शांत झाल्यानंतर पीडित महिलेनं पुन्हा पेरणे फाटा इथं जायचं ठरवलं. आळंदीमधील नदीच्याकडेला असलेल्या बस्थानकाजवळ ही महिला थांबली. तिथे दोन अनोळखी इसम उभा होते. त्यांना पेरणे फाटा येथे जायचं आहे असं महिलेने सांगितले. तेव्हा, आयशर टेम्पो पेरणे फाटा येथे जाणार असल्याचे त्या दोघांनी सांगितले.

नदीच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या टेम्पोमध्ये रात्री अकराच्या सुमारास महिला बसली. टेम्पोमध्ये महिला, क्लीनर आणि चालक हे तिघेजण होते. थोड्या अंतरावर गेल्यानंतर टेम्पो पेरणे फाटाच्या दिशने न जाता पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वळला. महिलेने चालकाकडे विचारणा केली इकडे कुठे? तेव्हा चालकाने हा दुसरा रस्ता आहे असं सांगितलं. महिलेने टेम्पोमधून उतरण्याचा आग्रह केला. पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे भरधाव वेगात असलेल्या टेम्पोत पीडित महिले सोबत क्लीनरने बळजबरी केली. महिलेने प्रतिकार केला असता महिलेला मारहाण करण्यात आली. महिलेने आरडा ओरडा केला, मात्र चालकाने संबंधित महिलेचे हात धरले होते आणि क्लीनरने महिलेवर धावत्या टेम्पोमध्ये बलात्कार केला. हे सर्व चालकासमोर झाल्याने चालकाने टेम्पो पुणे-मुंबईच्या दिशेने वळवला.

त्यानंतर शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो थांबवून क्लीनरनंतर चालकाने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. पीडित महिला त्यांच्या तावडीतून सुटका करत पळून गेली. दरम्यान, शेजारी असलेल्या इमारतीतील सुरक्षा रक्षकाच्या मदतीने तीने शिरगाव पोलीस चौकी गाठली. त्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली. दरम्यान, अद्याप आरोपी मोकाट असून आळंदी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पिंपरीत दिवसाआड एका महिलेवर बलात्कार

पिंपरी चिंचवडमधील महिला अत्याचारांविषयीची आकडेवारी काही महिन्यापूर्वी समोर आली होती. डिसेंबर २०१९ मध्ये आलेल्या आकडेवारीत पिंपरी-चिंचवड शहरात महिन्याला सरासरी १२ महिलांवर बलात्कार होत आहे. तर, ३४ महिलांना विनयभंगासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. ११ महिन्यांत तब्बल १३४ महिलांवर बलात्कार झाला आहे; तर ३७७ महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे. बलात्काराच्या १३४ गुन्ह्यांपैकी १३२ गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पिंपरी चिंचवडमधील महिला सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 10:02 am

Web Title: rape on women in running tempo bmh 90
Next Stories
1 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिढीतील दुर्मिळ नाणी जमा करणारा अवलिया
2 भाजपाकडून राज्यसभेचं तिसरं तिकीट मलाच : संजय काकडे
3 शहरातील अनेक रस्ते ‘पदपथ विरहित’
Just Now!
X