पुण्यातील खडकवासला कालवा फुटून आठवड्याभराचा कालावधी होऊन गेला तरीही सर्व्हे क्रमांक 214 मधील नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही.त्यामुळे आज त्या घटनेतील पीडितांनी दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौकात ठिय्या आंदोलन केले.
खडकवासला कालवा फुटून 400 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे.तर या घटनेत 133 आणि 214 मधील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे.मात्र यामध्ये सर्व्हे नंबर 133 नागरिकांना मदत मिळत असून सर्व्हे नंबर 214 मधील राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.ही चुकीची बाब आहे.यावर पुणे महापालिका,जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने आमच्या या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला मदत करावी अन्यथा येत्या काळात तीव्र लढा उभारू असा इशारा देखील नागरिकांनी यावेळी दिला.