कठोर टाळेबंदीच्या काळात राहिलेल्या ग्रंथ खरेदीसाठी आता मराठी वाचक ऑनलाइन माध्यमाला पसंती देत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याऐवजी गेल्या तीन महिन्यांपासून ऑनलाइन पुस्तके  मागवण्याचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढल्याचे निरीक्षण पुस्तक विक्रेते, प्रकाशकांकडून नोंदवण्यात आले. प्रकाशक, पुस्तकांच्या दालनांच्या संकेतस्थळांसह फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन अशा संकेतस्थळांवरून पुस्तकांची खरेदी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.

पुस्तकांसाठी ऑनलाइन पद्धतीने मागणी नोंदवली जात असल्याचे मेहता प्रकाशनचे सुनील मेहता यांनी नमूद के ले. टाळेबंदी हटवल्यानंतर लगेचच पुस्तक व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास मदत होत आहे. टाळेबंदीच्या काळात समाजमाध्यमांत पुस्तके , वाचनांसंदर्भात के लेल्या कार्यक्रमांनी वातावरण निर्मिती होण्यास मदत झाली. मात्र पुस्तकांची ऑनलाइन मागणी बहुतांश शहरी भागातील आहे. अजूनही राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत प्रकाशक, विक्रे ते पोहोचलेले नाहीत. प्रकाशकांनी एकत्र येऊन तालुकास्तरावर दालने सुरू के ल्यास वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल, असेही मेहता यांनी स्पष्ट केले.

पुस्तक पेठ या दालनाचे संचालक संजय भास्कर जोशी म्हणाले, की संकेतस्थळावरील मागणीसह फे सबुक, व्हॉट्स अ‍ॅप, दूरध्वनीसारख्या अन्य समाजमाध्यमांतूनही मोठा प्रतिसाद येतो आहे. ऑनलाइन विक्री वाढल्याने दालनांत येणारे वाचक घटलेले नाहीत. तर दालनांत येऊन वाचून पुस्तक निवडणारे वाचकही मोठय़ा संख्येतच आहेत. ऑनलाइनद्वारे विक्री वाढली हे अधिक सकारात्मक आहे.

‘संकेतस्थळासह अ‍ॅमेझॉनसारख्या संकेतस्थळावरून पुस्तके मागवली जात आहेत. त्याशिवाय विक्रेत्यांच्या संकेतस्थळावरूनही पुस्तके  मागवली जात आहेत. अर्थात दुकानांतून विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या तुलनेत ऑनलाइन विक्रीचे प्रमाण कमीच आहे. पण पुस्तकांचा व्यवहार पूर्वपदावर येऊ लागला आहे,’ असे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांत समाजमाध्यमात पुस्तकांविषयी केलेल्या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकांना पुस्तके हवीत..

टाळेबंदीच्या काळात लोक पुन्हा वाचनाकडे वळले. चरित्र, कथा-कादंबऱ्या, लहान मुलांची पुस्तके  यांची विक्री उत्तम होत आहे. ऑनलाइन मागणी दुपटीपेक्षा जास्त वाढली. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी अशा राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पुस्तकांची मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे लोकांना पुस्तके हवी आहेत हे अधोरेखित झाले.

 पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक

पुस्तकांची मागणी वाढत असताना प्रकाशकांनी पुस्तकांचा पुरवठा सातत्यपूर्ण आणि सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. वाचकांचा प्रतिसाद असलेली अनेक पुस्तके  ‘आऊट ऑफ प्रिंट’ असून, त्यांची पुन: छपाई प्रकाशकांनी करण्याची गरज आहे, असे संजय भास्कर जोशी यांनी नमूद केले.

गेल्या दोन-तीन महिन्यांत पुस्तकांची ऑनलाइन मागणी नोंदवण्याचे प्रमाण जवळपास दुपटीपेक्षा जास्त वाढले. टाळेबंदीच्या काळात वाचकांनी नोंदवलेली मागणी पूर्ण करण्यातच बराचसा वेळ गेला. त्यानंतरही वाचकांकडून ऑनलाइन मागणी सुरूच आहे.

– रमेश राठिवडेकर, संचालक, अक्षरधारा बुक गॅलरी