पुणे : रेमडसिविर, पीपीई किटवर वस्तू आणि सेवा कर लावण्यात आल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च कमी होण्याच्या दृष्टीने रेमडेसिविर आणि पीपीई किटवर लावण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर माफ करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे के ली आहे.

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि महाराष्ट्रात धुमाकू ळ घातला आहे. करोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्यामुळे दैनंदिन हजारो रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागत आहे. या उपचारांमध्ये रेमडेसिविर, पीपीई किट यांचा समावेश आहे. मात्र उपचारांचा वाढीव आर्थिक बोजा रुग्णांना सहन करावा लागत आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनवर १२ टक्के  तर पीपीई किटवर १८ टक्के  वस्तू आणि सेवा कर आकारला जात आहे. तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला वापराव्या लागणाऱ्या सॅनिटायझरवरही १८ टक्के  वस्तू आणि सेवा कर आहे. राष्ट्रीय आपत्ती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेमडेसिविर, पीपीई किट आणि सॅनिटायझरसह करोना उपचाराशी संबंधित सर्व वस्तू, औषधे आणि साधनांवरील वस्तू आणि सेवा कर माफ के ल्यास त्याच्या कि मती नियंत्रणात राहतील, असे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.