जबाबदारीमुळे अडचणीत वाढ; खासगी करोना काळजी केंद्रांतील रुग्णांनाही रेमडेसिविर देण्याची राज्य शासनाची सूचना

पुणे : महापालिके च्या रुग्णालयातील रुग्णांबरोबरच प्राणवायू खाटांची सुविधा असलेल्या खासगी करोना काळजी केंद्रातील रुग्णांना महापालिके ने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने के ली आहे. रेमडेसिविरची उपलब्धता आणि त्याचे वितरण या कामांमुळे महापालिके च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिके ने शहराच्या विविध भागांत करोना काळजी केंद्रे उभारली आहेत. या करोना काळजी केंद्रांमध्ये काही ठिकाणी प्राणवायू सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या काळजी केंद्रांत उपचारासाठी  अल्प उत्पन्न गटातील रुग्ण दाखल होत आहेत. करोना काळजी केंद्रांच्या माध्यमातून महापालिके ने १ हजार २५० खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत.

तसेच महापालिके च्या मान्यतेने काही ठिकाणी खासगी करोना काळजी केंद्रांचीही उभारणी करण्यात आली आहे. शहरात सध्या ३१ खासगी करोना काळजी केंद्रे आहेत. या करोना काळजी केंद्रातील रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सातत्याने केंद्र चालकांकडून होत होती. त्यावर खासगी करोना काळजी केंद्रातील प्राणवायू दिलेल्या रुग्णांना रेमडेसिविर द्यावे, कृ ती दलाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा पुरवठा करावा, असे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट के ले आहे.

शहरातील ३१ खासगी करोना काळजी केंद्रांत ७७५ प्राणवायू खाटांची सुविधा आहे. महापालिके ला मिळणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन साठ्यातून खासगी केंद्रांना ते वितरीत करावे लागणार आहे. त्याबाबतचे अधिकार महापालिके ला देण्यात आले आहेत.

सध्या रेमडेसिविरचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासगी आणि शासकीय रुग्णालयांना केला जात आहे. मात्र रेडमेसिविरचा तुटवडा असून  रेमडेसिविर आणण्यासाठी रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती के ली जात आहे. त्यातच शहरात रेमडेसिविरचा काळाबाजरही सुरू झाला आहे. या परिस्थितीत खासगी करोना काळजी केंद्रांना रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याच्या सूचनेमुळे महापालिके च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लसीकरणाला आजपासून अंशत: सुरुवात

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन करोना प्रतिबंधक लशींचा अल्प का होईना साठा महापालिके ला मंगळवारी प्राप्त झाल्याने तीन दिवसांपासून ठप्प असलेली लसीकरण मोहीम बुधवारी अंशत: सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ४५ वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण बुधवारपासून सुरू होणार असून यामध्ये पहिली मात्रा घेणाऱ्या नागरिकांबरोबरच दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस दिली जाईल, असे महापालिके च्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. करोना प्रतिबंधक लस उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली होती. मंगळवारीही लस उपलब्ध न झाल्यामुळे सर्व लसीकरण केंद्रे बंद राहिली. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिके ला २० हजार मात्रा मंगळवारी उपलब्ध झाल्या. त्यामुळे बुधवारपासून अंशत: लसीकरण होणार असल्याचे स्पष्ट झाले.  दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १० हजार मात्रा उपलब्ध झाल्या आहेत.

यापूर्वी महापालिके ला ५ हजार मात्रा उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने के ले आहे. मंगळवारी महापालिके च्या कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन केंद्रांत मिळून ६६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या दोन्ही केंद्रांतून १८ ते ४४ वयोगटातील ७०० नागरिकांचे दिवसाला लसीकरण करण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी शहरात एकू ण १८२ केंद्रे आहेत.