24 January 2021

News Flash

आम्हीपण तुमचे बाप आहोत हे लक्षात ठेवा; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला

पुण्यात भाजपाच्या कार्यक्रमात केली टीका

“पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी पाटील बोलत होते.

भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाटील म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत ज्यांना सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ खासदार आपले मिळाले आणि मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत, अशा एका प्रचंड मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.”

आणखी वाचा- ‘एमपीएससी’ परीक्षांबाबत अगोदरच निर्णय घ्यायला हवा होता; हे सरकार दिशाहीन आहे – चंद्रकांत पाटील

“पुणे महानगरपालिकेत काल झालेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वायाला घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील अजित पवार यांना टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 2:10 pm

Web Title: remember that we are also your father chandrakant patil slammed on ajit pawar aau 85 svk 88
Next Stories
1 शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे करोनामुळे निधन
2 प्रभाग समिती अध्यक्षपदांवर भाजपचे वर्चस्व
3 कांदा दरातील वाढ थांबली
Just Now!
X