News Flash

पिंपरी-चिंचवड : ५००० विद्यार्थ्यांनी सादर केले देशभक्तीपर गीत

सामूहिक गीत सादर केल्यानंतर १४ ते १५ विद्यार्थाना चक्कर आली; रुग्णवाहिका नावापुरती

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पिंपरी-चिंचवड शहरातील मदनलाल धिंग्रा या मैदानावर ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थानी एकत्र येऊन देशभक्तीपर सामुहिक गीत सादर केले,मात्र हे गीत सादर करत असताना १४ ते १५ विद्यार्थाना चक्क आल्याची घटना घडली.वेळीच त्यांच्यावर उपचार व्हावेत म्हणून मैदानावर रुग्णवाहिका देखील होती,परंतु त्यात औषध नसल्याचे तेथील महिला डॉक्टर ने सांगितल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत.चक्कर आलेल्या विद्यार्थाना राजगीऱ्याचा लाडू खाण्यास देण्यात आले,प्रत्येक्षात मात्र तेथे दुधाच्या बाटल्या उपलब्ध होत्या.

सदर कार्यक्रम हा पिंपरी-चिंचवड महानगर पालिका,क्रीडा विभाग,प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात माध्यमिक आणि मनपाच्या प्राथमिक अश्या ऐकून १०५ शाळा सहभागी झाल्या होत्या.शाळेतील ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थानी एकत्र येऊन देशभक्तीपर गीत सादर केले,यात ‘आता उठवू सारे रान’, ‘जहाँ डाल डाल पर’, ‘उठा राष्ट्रविर हो सज्ज व्हा’ असे ऐकून तीन देशभक्तीपर गीत सादर केले.

दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक हे सकाळी साडेसहा वाजल्यापासून मैदानावर आले होते.अशी माहिती तेथील विद्यार्थ्यांनी दिली आहे.त्यामुळे देशभक्तीपर गीत सादर झाल्यानंतर अनेक विद्यार्थाना चक्कर आली होती.संबंधित १४ ते १५ विद्यार्थाना स्टेज च्या बाजूला बसवण्यात आले त्यांना राजगिऱ्याचा लाडू खाण्यासाठी देण्यात आले,मात्र रुग्णवाहिका असताना देखील त्यात औषध नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत.विद्यार्थाना तसेच बसवण्यात आले.संबंधित महिला डॉक्टर केवळ बघ्याची भूमिका घेत होती.बर एवढं झाल्यानंतर देखील तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांनी भाषणे सुरू केली,यावेळी कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव,आयुक्त श्रावण हर्डीकर,सत्तारूढ नेते एकनाथ पवार,आमदार महेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:43 pm

Web Title: republic day 2019 5000 student pimpri chinchawad republic day 2019
Next Stories
1 दहावीच्या विद्यार्थ्यांना तिसरा सराव प्रश्नसंच मिळणार
2 डॉ. सुदाम काटे यांना ‘पद्मश्री’
3 पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची शाळांवर सक्ती
Just Now!
X