शहरात ६६वा प्रजासत्ताकदिन उत्सहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पेहरावात फेरी काढून विविधतेचे दर्शन घडवले. शासकीय कार्यालय, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, संघटनांनी ठिकठिकाणी ध्वजवंदन करून मानवंदना दिली. तसेच प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात रक्तदान शिबिर, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊवाटप, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने निवृत्त पोलीस महासंचालक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी एम.सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टतर्फे प्रजासत्ताकदिनानिमित्त विद्यार्थ्यांचे कवायत, नाटक, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी उद्योगपती आबा रासकर उपस्थित होते. श्री पोटसुळय़ा मारुती मंडळातर्फे प्रजासत्ताकदिनानिमित्त ससून संस्थेतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंजूषा गोंगले उपस्थित होत्या.
दिग्विजय तरुण मंडळाचे अध्यक्ष मनोज जगताप यांनी चार सामाजिक संस्थांना प्रजासत्ताकदिनी प्रत्येकी एक लाख रुपये देणगी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण उपस्थित होत्या. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शिवराज वाल्मीकी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी अ‍ॅड. अभय छाजेड उपस्थित होते. कृष्णाई महिला मंडळातर्फे ध्वजारोहण करण्यात आले. पुणे नवनिर्माण सेवातर्फे (संघ) ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी अजय पैठणकर उपस्थित होते. मृत्युंजय मित्रमंडळाच्या वतीने ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली. पूर्णवाद युवा फोरम संस्थेच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी प्रसाद तारे यांनी ध्वजाचे महत्त्व आणि परंपरा याबद्दल माहिती दिली. ब्रह्मांड संस्थेतर्फे प्रजासत्ताकदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या वेळी सुनील कुमार उपस्थित होते. जिजाऊ मार्केटिंग स्वयंरोजगार सहकारी महिला सेवा संस्थेच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी माजी महापौर कमल व्यवहारे उपस्थित होत्या.