प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेकडून पुणेकरांना अनोखी भेट मिळणार आहे. शहरात नागरिकांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महापालिकेने १५० महत्वाच्या ठिकाणी हॉटस्पॉट उभारण्यात आले आहेत. उद्या, २६ जानेवारीपासून ही सुविधा मिळणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्टसिटीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. पुणे शहरातील महाविद्यालये, प्रमुख रस्ते, पोलीस स्टेशन, उद्याने, पालिकेच्या इमारती या ठिकाणांचा विशेष ठिकाणे म्हणून या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या मोफत वाय-फाय योजनेतील पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीला ५० एमबी डेटा मोफत वापरता येणार आहे. त्यानंतरचा वापर हा सशुल्क असणार आहे.