25 September 2020

News Flash

भारती विद्यापीठातर्फे ‘रेझिलियन्स’ संपन्न

भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर आधारित ‘रेझिलियन्स २०१४’चे आयोजन करण्यात आले होते.

| February 18, 2014 02:40 am

भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनावर आधारित ‘रेझिलियन्स २०१४’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी दर्शविणारे ‘स्टोन, पेपर, सिजर्स’ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महापालिका आयुक्त महेश पाठक उपस्थित होते. ‘रेझिलियन्स’च्या निमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाच्या सामुग्रीचे प्रदर्शन, महापालिकेच्या वतीने प्रात्यक्षिके, आपत्ती व्यवस्थापनावर व्याख्याने, शहरी आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीच्या काळात रुग्णालयांची भूमिका यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे आदी उपक्रमही आयोजित करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 2:40 am

Web Title: resilience 2014 by bharati vidyapeeth
टॅग Bharati Vidyapeeth
Next Stories
1 सामान्य माणसाचा वरिष्ठ सभागृहात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर
2 अतिरेकी बोलून वेगळे चित्र निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न- शरद पवार
3 एकापेक्षा अधिक प्रवेशपत्रांनी बारावीचे विद्यार्थी गोंधळात
Just Now!
X