News Flash

लॉकडाऊनमुळे आगळीवेगळी सेवानिवृत्ती

पुण्यात काम करणारे बिहामधून झाले निवृत्त

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे या कार्यालयातील सहायक संचालक या पदावर कार्यरत असणारे अशोक काथवटे हे दि 30 एप्रिल 2020 रोजी वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ झूमद्वारे आयोजित करण्यात आला होता. कोविड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन कार्यक्रम घेण्यास बंदी असताना आगळ्या वेगळ्या प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन परिषेदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या कल्पनेतून करण्यात आले होते.

या ऑनलाइन कार्यक्रमास परिषेदेतील सर्व अधिकारी तसेच अशोक काथवटे यांचे चिरंजीव व गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मयूर काथवटे, त्यांच्या सुनबाई व नेल्लोर च्या जिल्हाधिकारी कल्पना कुमारी काथवटे यांच्यासह एकूण 70 सदस्य झूम द्वारे या कार्यक्रमास एकत्र आले होते. अशोक काथवटे यांचे चिरंजीव मयूर काथवटे हे बिहार राज्यात गया या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशोक काथवटे त्यांना भेटायला गया बिहार या ठिकाणी गेले होते. मात्र लॉक डाऊन असल्याने त्यांना परत पुण्यात येता आले नाही. या करिता संचालक दिनकर पाटील यांच्या कल्पनेनुसार हा कार्यक्रम आयोजित केला होता.

झूम अँप द्वारे अशोक काथवटे त्यांचे चिरंजीव जगदीश व मयूर काथवाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशोक काथवाटे यांनी सेवेत रुजू झाल्यापासून निवृत्ती पर्यंतचे आपले अनुभव सांगितले. संचालक दिनकर पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रामाणिक पणे सेवा करणारा आजात शत्रू असा उल्लेख करून अशोक काथवटे साहेबांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. विकास गरड उपसंचालक, मुजावर सहायक संचालक, वृषाली गायकवाड यांनी आपली मनोगते झूम द्वारे व्यक्त केली.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी मुलाकडे भेटायला गेलेले काथवटे साहेब लॉक डाऊनमुळे बिहारला अडकले. त्यामुळे आज ते बिहार मधून रिटायर झाले. मुलगा कलेक्टर बिहारमधून व सून कलेक्टर आंध्र प्रदेश मधून व ऑफिस पुण्यात असा कार्यक्रम झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 11:07 am

Web Title: retirement program officer online due to lock down nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिलासादायक! पुण्यात माय लेकरांनी केली करोनावर मात
2 उद्योगनगरी संकटात
3 अवघ्या सहा महिन्यांत जिल्ह्य़ात टँकर सुरू
Just Now!
X