महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार क्षेत्रीय कार्यालयानिहाय नेमणूक करण्यात आलेल्या निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यांची यादी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार विभागीय मुख्य निवडणूकनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कुंडल प्रशिक्षण केंद्र येथील उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे यांच्याकडे ८ आणि ९ या प्रभागांचे काम सोपविण्यात आले असून त्यांना विनोद रणावरे, संदीप कदम आणि सुनील यादव हे साहाय्य करतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या विजया पांगारकर यांच्याकडे ७, १४ आणि १६ या प्रभागांचे काम सोपविण्यात आले असून जयश्री माळी, नितीन उदास आणि संजय शेंडे त्यांना साहाय्य करतील.

विशेष भूसंपादन अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांना रमा जोशी, जयंतकुमार भोसेकर आणि शिवाजी लंके हे साहाय्य करतील. त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ ची जबाबदारी देण्यात आली आहे. भाडे नियंत्रण न्यायाधिकरणच्या नंदिनी आवाडे यांना डी. आर. सावंत, गणेश सोनुने आणि अभिजित डोंबे हे साहाय्य करणार असून त्यांच्याकडे १३, ३१ आणि ३२ या प्रभागांचे काम सोपविण्यात आले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अजित देशमुख यांच्याकडे १, २ आणि ६ या प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून या अनिता देशमुख, विजय लांडगे आणि ज्ञानेश बार्शिकर त्यांना साहाय्य करतील. प्रभाग क्रमांक ३ ते ५ ची जबाबदारी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे प्रशांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांना कल्पना ढवळे, वसंत पाटील,

इंद्रभान रणदिवे साहाय्य करणार

आहेत. प्रभाग क्रमांक १८ ते २० ची जबाबदारी रोजगार हमी योजनेच्या संजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना सुचेत्रा पाटील, संध्या गांगरे, श्रीधर येवलेकर साहाय्य करतील. जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले यांना नागेश पाटील, अरुण खिलारी, सुधीर कदम साहाय्य करणार आहेत. ते १५, १७ आणि २९ या प्रभागांचे काम पाहणार आहेत.

उपजिल्हाधिकारी वर्षां लांडगे यांच्याकडे ३०, ३३ आणि ३४ या प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांना गजानन गुरव, रवी पवार, रवींद्र  ढवळे साहाय्य करतील. विशेष भूमी संपादन अधिकारी हर्षलता गेडाम यांना रणजीत देसाई, उमेश माळी, नामदेव गंभीरे हे प्रभाग २८, ३५ आणि ३६ च्या कामात साहाय्य करतील.

प्रभाग क्रमांक २७, ३७ आणि ४१ ची जबाबदारी पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणच्या राणी ताटे यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांना रणजीत भोसले, अविनाश संकपाळ आणि राजेंद्र तांबे साहाय्य करणार आहेत. प्रभाग क्रमांक ३८ ते ४० मोनिका सिंह यांच्याकडे सोपविण्यात आले असून त्यांना शिवाजी शिंदे, युनस पठाण आणि दिनकर गोंजारे साहाय्य करतील.

सुभाष बोरकर यांच्याकडे २१ ते २३ प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांना गीता गायकवाड, सुनील गायकवाड आणि सुधीर चव्हाण साहाय्य करणार आहेत. हवेलीच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम या प्रभाग क्रमांक २४ ते २६ चे काम पाहणार आहेत. त्यांना रामलिंग चव्हाण, माधव देशपांडे, राजेश बनकर साहाय्य करतील.