अखिल भारतीय गांधर्व मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘संगीताचार्य’ या परीक्षेत गायिका रेवा नातू यांना सर्वोच्च गुण मिळाले आहेत. ८ जून रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या दीक्षान्त समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.
नातू यांना ‘संगीताचार्य’ व ‘गायन’ या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांना नऊ पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ‘गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’, ‘विनायकराव पटवर्धन’, ‘पं. यशवंतबुवा मिराशी’ यांच्यासह अन्य सहा पुरस्कारांचा समावेश आहे. संगीताचार्य परीक्षेसाठी शास्त्रीय गायन,तसेच शाेधनिबंध सादर केला हाेता.  ‘कालानुरुप होणारे संगीताच्या सादरीकरणातील बदल : ग्वाल्हेर गायकीच्या संदर्भात’ हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले.