|| राहुल खळदकर

उत्पादन कमी झाल्याचा परिणाम; आणखी काही काळ दर चढेच :- सुगंधी आंबेमोहोर तांदळाच्या दरात उच्चांकी वाढ झाली असून गेल्या दोन महिन्यात आंबेमोहोर तांदळाच्या दरात प्रतिक्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल आंबेमोहोर तांदळाला साडेसात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला. परिणामी, किरकोळ बाजारातही आंबेमोहोर महागला असून आंबेमोहोर तांदळाची विक्री प्रतिकिलो ८० रुपये दराने केली जात आहे.

Gold price bounced in four hours on Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
Weather Forecast
भारतात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा

राज्यभरात डसेंबर महिन्यात नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक सुरू होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आंबेमोहोरचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असे होते. महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा ८० टक्के आंबेमोहोर मध्यप्रदेशातून तसेच उर्वरित तांदूळ आंध्र प्रदेशातून येतो, असे पुणे मार्केटयार्डमधील तांदळाचे प्रमुख व्यापारी जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी सांगितले.

आंबेमोहोर आणि कोलमचे दर साधारण सारखेच असतात. यंदाच्या वर्षी सुरुवातीला लचकारी कोलम तांदळाला प्रतिकिंवटल ४२०० ते ४३०० रुपये असे दर मिळाले होते. आंबेमोहोरला ४८०० ते ५००० रुपये  असे दर मिळाले होते. आंबेमोहोर तांदळाचा उत्पादन खर्च अधिक आहे तसेच आंबेमोहोरचा उत्पादन कालावधी साडेतीन महिने आहे. त्यातुलनेत कोलम तांदळाचा उत्पादन खर्च आणि उत्पादन कालावधी कमी असल्याने मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील शेतक ऱ्यांचा कल कोलम तांदळाच्या उत्पादनाकडे वाढला असल्याचे निरीक्षण शहा यांनी

नोंदविले.’कारण काय?

आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांत घेतले जाते. मध्यप्रदेशात आंबेमोहोर ‘विष्णूभोग’ नावाने प्रसिद्ध आहे. यंदा या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी आंबेमोहोरचे उत्पादन कमी प्रमाणात घेतले. आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनाचा खर्च आणि कालावधी अधिक असल्यामुळे उत्पादकांनी कोलम तांदळाला पसंती दिली. तसेच सौदी अरब आणि बांगलादेशातून आंबेमोहोरच्या मागणीत वाढ झाली. नवा आंबेमोहोर तांदूळ येण्यास वेळ लागणार असल्याने किंमती वाढल्या आहे.