X
X

पर्यावरण रक्षणासाठी आम्हीपण..!

READ IN APP

रिक्षाचालकांनी पर्यावरण रक्षणासाठी आम्हीपण सज्ज असल्याचे दाखवून दिले

वृक्षारोपणासाठी रिक्षाचालकांनी खोदले दोनशे खड्डे
भल्या सकाळीच गाठलेली पौडजवळील शिर्के वस्ती.. कुदळ आणि फावडे या साधनांसह सज्ज झालेले रिक्षाचालक.. दिवसभराच्या श्रमदानातून खोदलेले दोनशे खड्डे.. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांनी पर्यावरण रक्षणासाठी आम्हीपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.
पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वृक्षायन फाउंडेशनच्या वृक्षराजी फुलविण्याच्या उपक्रमाला आम आदमी रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. एक जुलैला वृक्षारोपण कार्यक्रम करण्यासाठी रिक्षाचालकांनी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह रविवारी श्रमदानातून दोनशे खड्डे खणले. फाउंडेशनला वन विभागाने पौडमधील शिर्के वस्तीमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी जागा दिली आहे. त्या जागेवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी या परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी जाऊन श्रमदान केले.
श्रीकांत आचार्य, सुभाष कारंडे, सुधीर तळवलकर, राजेंद्र वऱ्हाडे या वृक्षायन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह अशोक शिंदे, शकील खान, नफीस शेख, बाहशहा पटेल, कानिफनाथ घोरपडे, कुमार शेट्टी, गणेश ढमाले, बाबा सय्यद, आनंद अंकुश, गणेश वैराट, इम्रान शेख, जमीर शेख, केदार ढमाले, जाफर कादरी, वासिम सय्यद, पंकज दुबे, अभिजित माने, कमरुद्दीन पठाण, सनी मस्के, राजेश यादव, सुभाष जावळे, आसिफ शेख, सुशांत शिंदे या आम आदमी रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानामध्ये सहभाग घेतला.

21
X