News Flash

भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, ५ विद्यार्थी जखमी

उरुळी कांचन येथे अपघात, तिघा जणांची प्रकृती गंभीर

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे एका भरधाव ट्रकने सहा नागरिकांना उडवले. या घटनेत एक ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थी जखमी असून त्यापैकी तिघा जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-सोलापूर मार्गावरील उरुळी कांचन येथे आज (गुरूवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही वाहने उभी होती. या रस्त्यावर वामन कांचन (वय ७५) हे श्रीगोंद्याला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभे होते. त्यांच्या शेजारीच महाविद्यालयासाठी जाण्यासाठी ५ ते ६ विद्यार्थी थांबले होते. याचदरम्यान भरधाव ट्रकने प्रथम काही वाहनांना उडवले व नंतर बसची वाट पाहत असलेल्या वामन कांचन व विद्यार्थ्यांना उडवले. यात कांचन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला. पोलीस तपास करत आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 11:37 am

Web Title: road accident at urali kanchan 1 senior citizen died 5 student injured
Next Stories
1 अर्धीच भाऊबीज देणारा मुख्यमंत्री नको..!
2 हंगाम थंडीचा, पण विजेची मागणी उन्हाळ्याप्रमाणे!
3 बिटकॉइनच्या आमिषाने व्यावसायिकांना ४२ लाखांचा गंडा
Just Now!
X