News Flash

चाकण परिसरात रो हाऊसवर दरोडा,१५ तोळे सोन्याचे दागिने लंपास

पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत

पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण परिसरात अज्ञात तीन चोरांनी रो हाऊसवर दरोडा टाकण्यात आला. या घटनेत तब्बल ८ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेप्रकरणी गोविंद निवृत्ती जाधव (वय-५०) यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गोविंद निवृत्त जाधव हे त्यांच्या कुटुंबासह चिंचवड येथे मुलीला भेटण्यास आले होते. तेव्हा, त्यांच्या घरी कोणी नसल्याचे खात्री बाळगून मंगळवारी पहाटे च्या सुमारास अज्ञात तीन चोरांनी रो हाऊसवर दरोडा टाकला यात १५ तोळे सोन्याचे दागिने, ४ लाख २ हजार रुपयांची रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांचे स्पोर्ट शूज देखील अज्ञात तीन जणांनी चोरून नेले आहेत. मंगळवारी जाधव कुटुंब घरी आल्यानंतर दरोड्याचा घटना समोर आली आहे. या घटने प्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 4:15 pm

Web Title: robbery in chakan robbers looted 8 56 lakh scj 81
Next Stories
1 पुणे: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पतीविरोधात पत्नीनेच दाखल केली तक्रार
2 गंधर्व सुरांचा दरबार आजपासून पाच दिवस
3 ‘सेवा’ कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांची गैरसोय
Just Now!
X