पुण्याच्या आपटे रोड परिसरात भरदिवसा धाडसी दरोडा पडल्याचे वृत्त आहे. येथील एका बंगल्यात शिरुन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून ५ लाख ७० हजारांचा ऐवजी दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. गुरुवारी सकाळी मध्यवस्तीत असणाऱ्या डेक्कन भागात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हेमाजी गुलाबचंद छेडा (वय ६३, रा. सरोज सदन बंगला, आपटे रस्ता (मूळ-बंगळूरू)) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हेमाजी छेडा यांच्यासह त्यांचे मेहुणे हंसकुमार खेमजी, कारचालक शिवाजी मेदगे, नोकर अनंत राम चंद्रवले आणि मोलकरीन ताईबाई यांच्यासह उपस्थित होते. ज्या सरोज सदन बंगल्यात हा दरोडा पडला तो हंसकुमार केमजी यांचा वडिलोपार्जित मालकीचा बंगला आहे.
दरम्यान, २५ ते ३० वयोगटातील चार चोरटे बंगल्यात शिरले आणि घरातील सर्वांवर त्यांनी पिस्तूल रोखले. त्यांच्याकडे असलेले सोने, मोबाईल आणि काही रक्कम अशी मिळून ५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवजी काढून घेतला आणि पोबारा केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2019 8:19 pm