03 March 2021

News Flash

लष्करी अधिकाऱ्याच्या घरात पदाकांसह चार लाखांची चोरी

कोथरूडच्या पौड रस्ता भागातील लष्कराच्या एका अधिकाऱ्याचा घरातून चोरटय़ांनी दोन पदकांसह चार लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

| May 10, 2013 02:00 am

कोथरूडच्या पौड रस्ता भागातील लष्कराच्या एका अधिकाऱ्याचा घरातून चोरटय़ांनी दोन पदकांसह चार लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
सदाशिव वामन चितळे (रा. मंगल बंगला, अनंत कृपा हाउसिंग सोसायटी, पौड रस्ता, कोथरूड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. चितळे यांचा मुलगा लष्करामध्ये आहे. शनिवारी सकाळी सात ते बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास चितळे बाहेरगावी गेल्याने त्यांचा बंगला बंद होता. या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला. लोखंडी कपाटातील तिजोरीही चोरटय़ांनी उचकटली. तिजोरीतील १५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पाच किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू तसेच काही रोख रक्कम चोरटय़ांनी पळविली. चितळे यांच्या मुलाला लष्करात मिळालेली दोन पदकेही या चोरटय़ांनी पळवून नेली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 2:00 am

Web Title: robbery of medals with 4 lakh cash from military officers house
Next Stories
1 भारती विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण
2 देशाचे मंत्रिमंडळ उद्योगपतींच्या खिशात – विश्वंभर चौधरी
3 वीजबिलातील सुरक्षा ठेवीवर ग्राहकांना ९.५ टक्के व्याज
Just Now!
X