News Flash

आज रंगणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’ची ‘रॉक कॉन्सर्ट’

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आज महाविद्यालयीन तरुणांना मिळणार आहे.

| July 30, 2015 03:22 am

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी आज महाविद्यालयीन तरुणांना मिळणार आहे. मालिकेतील कलाकार अभिनेते सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर आणि सखी गोखले कॉन्सर्टसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.‘सारेगमप’ या कार्यक्रमातील मागील पर्वाची विजेती जुईली जोगळेकर आणि सहकाऱ्यांचा ‘अगम्य बँड’ या वेळी सादरीकरण करेल. गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कॉन्सर्टची प्रसिद्धी गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयांमध्ये सुरू असून महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि कार्यक्रमाची प्रवेशिका घेतलेले विद्यार्थी त्याचा आनंद घेऊ शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 3:22 am

Web Title: rock concert of tv serial dil dosti duniadari
Next Stories
1 चार महिने रखडलेल्या रस्त्याचे काम चार तासांत
2 नायडू व कमला नेहरु रुग्णालयात ऑगस्टअखेर डेंग्यू चाचण्या सुरू होणे अपेक्षित
3 पिंपरी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक संख्येत घसरण सुरूच
Just Now!
X