पिधानच्या निमित्ताने खगोलप्रेमींना निरीक्षणाची आगळी संधी
आज सोमवारी रोहिणी तारा म्हणजेच नक्षत्र चंद्रा मागे लपणार आहे, खगोलप्रेमींसाठी ही निरीक्षणाची एक वेगळी संधी आहे असे मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक अरिवद परांजपे यांनी सांगितले. या पिधान स्थितीत चंद्र पृथ्वी आणि रोहिणीच्या मध्ये येणार आहे. ही खगोलीय घटना रात्री आठनंतर होईल. हे पिधान नुसत्या डोळ्यांनी दिसणार असून त्यासाठी दुर्बिणीची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले. रोहिणी हा वीस चमकदार ताऱ्यांपकी एक असून त्याला अलदेबरान असे नाव आहे.
ते म्हणाले की, या पिधानाची वेळ वेगवेगळ्या जागेवरून वेगवेगळी आहे. सध्या चंद्राची स्थिती अशी आहे की भारतात उत्तर आणि पूर्वेकडील लोकांना हे पिधान अधी दिसेल. साधारणपणे रात्री सातच्या सुमारास चंद्रकोरीच्या वर पण डावीकडे रोहिणी तारा सहज लक्षात येईल. पृथ्वी आणि रोहिणीच्या मध्ये चंद्राची सूर्यप्रकाश न पडलेली बाजू आलेली असेल. अगदी दर १० मिनिटांनी तुम्हाला या दोघांतील अंतर कमी होत गेल्याचे सहज जाणवेल. मग पिधानाच्या काही सेकंद आधी हे दोघे एक मेकांना जवळजवळ चिकटलेले भासतील आणि मग क्षणार्धात रोहिणी नक्षत्र चंद्रामागे लपेल.
मग नंतर काही वेळाने रोहिणी चंद्राच्या चंद्र प्रकाशित भागातून परत बाहेर येईल. एकदा परत या दोघांतील वेगाने वाढत गेलेल अंतर तुम्हाला स्पष्ट जाणवेल.
महाराष्ट्रात दक्षिणेस दापोली, खेड, सातारा, पंढरपूर या शहरांतून हे पिधान दिसेल तर गणपतीपुळे, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या भागांतून दिसणार नाही. पण तिथल्या लोकांना एक वेगळे सुंदर दृश्य दिसेल. त्यांना चंद्र अगदी रोहिणीला चिकटून जाताना दिसेल आणि हे पण एक सुंदर दृष्यच असेल. याच वर्षी २१ सप्टेंबर आणि मग १५ नोव्हेंबर रोजी पण याच ताऱ्याचे पिधान भारतातून दिसणार आ पण दोन्ही वेळी चंद्रप्रकाश खूप जास्त असेल.

मुंबईत हे पिधान पुण्याच्या आधी दिसेल. तसेच हे पिधान फक्त उत्तर भारतातूनच दिसणार आहे. हे पिधान पाहण्यासाठी रोहिणी ओळखता आले पाहिजे असेच नाही. साधारणपणे रात्री सातच्या सुमारास चंद्रकोरीच्या वर पण डावीकडे रोहिणी तारा सहज लक्षात येईल.
– अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण