03 March 2021

News Flash

आरपीएफ जवानांचे प्रसंगावधान, ट्रेनमधून पडलेल्या १५ वर्षांच्या मुलीचे वाचवले प्राण

शेख रोजी शहाहुद्दीन ही १५ वर्षांची मुलगी तिच्या आई आणि नातेवाईकांसोबत कल्याणवरुन चिंचवडला येत होती.

गोंधळलेल्या शेखरोजीने धावत्या लोकल ट्रेनमधून उडी मारली. मात्र, ती प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडली.

चिंचवड येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाच्या प्रसंगावधानामुळे १५ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले आहे. शेख रोजी शहाहुद्दीन असे मुलीचे नाव असून गुरुवारी सकाळी ती लोकल ट्रेनमधून पडली होती.

शेख रोजी शहाहुद्दीन ही १५ वर्षांची मुलगी तिच्या आई आणि नातेवाईकांसोबत कल्याणवरुन चिंचवडला येत होती. लोणावळ्यात आल्यानंतर त्यांनी पुणे- लोणावळा ही लोकल ट्रेन पडली. त्यांना चिंचवड रेल्वे स्थानकात उतरायचे होते. मात्र गर्दीमुळे त्यांना उतरता आले नाही. गोंधळलेल्या शेखरोजीने धावत्या लोकल ट्रेनमधून उडी मारली. मात्र, ती प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडली. हा प्रकार लक्षात येताच प्लॅटफॉर्मवरील आरपीएफच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवली आणि मुलीला बाहेर काढले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.

शेखरोजी ही पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी भागातील असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर ट्रेन पकडताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस नाईक अनिल बागुल, तुकाराम वाळेकर, आर.पी.एफ जवान चंद्रकांत गोफने असे मुलीला वाचवलेल्या जवानांचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 3:50 pm

Web Title: rpf constables saves life of 15 year old girl passenger at chinchwad
Next Stories
1 VIDEO: मद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा
2 भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पुण्यात चार वर्षांच्या मुलाला पडले १७ टाके
3 कोंडीमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा
Just Now!
X